Event Detail
ग्रँट शास. वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

ग्रँट शास. वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. जेजे रुग्णालय परिसरात विविध ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला गेला. १. ग्रँट शास. वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय, मुंबई प्रशासनातर्फे मुख्य इमारत येथे २. डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (DAMA) या विद्यार्थी संघटनेतर्फे ३. कॉलेज ऑफ नर्सिंग ४. सुरक्षा रक्षक विभाग ५. जेजे रुग्णालय कर्मचारी संगठना सुभाष मैदान विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून मान्यवरांचे स्वागत महात्मा ज्योतीराव फुले यांची पुस्तके देऊन करण्यात आले. सदरील सर्व ठिकाणी डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता डॉ. संजय सुरासे, वैद्य. अधीक्षक तसेच वरिष्ठ डॉक्टर्स, अधिकारी, नर्सेस,कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. सर्वांना "भीम जयंती" च्या हार्दिक शुभेच्छा..!